Author Topic: " आभास "  (Read 641 times)

Offline शितल

  • Jr. Member
  • **
  • Posts: 137
  • Gender: Female
  • हळुवार जपल्या त्या भावना….
" आभास "
« on: May 24, 2015, 03:17:23 PM »

रात्रीच्या या कोऱ्या शांततेत
मला तुझाच भास होतो
वाहणारा वारा
तुझा स्पर्श देऊन जातो

सावलीत जेव्हा दिसतोस
मनाचा रस्ता वळतो
नेहमी असे विचार कुठून येतात
याचा पत्ता लावत असतो

दुसऱ्या विचारात चित्र रंगवतो
भानावर येताच विचार खुंटतो
तू दिसताच रस्ता चुकतो
हळूहळू सर्वत्र उजेड पसरतो

तुझ्या नावाचा गजर
मला रोज उठवतो……. !!!!!


शितल…

Marathi Kavita : मराठी कविता