Author Topic: "पाउल वळावू दे.." चारुदत्त अघोर  (Read 1196 times)

Offline charudutta_090

  • Jr. Member
  • **
  • Posts: 185
  • Gender: Male
  • A fall leaf of autumn,....!!
ॐ साईं.
"पाउल वळावू दे.."  चारुदत्त अघोर(११/५/११)                                       
नुसती जीवघेणी शांतता,कानी वाजतेय,
विचारांची तीव्रता,मनी सांजतेय;
या डूबत्या क्षीतीजी,संध्या रंगू दे,
एकतारी विचारांना,जरा भंगू दे;

या मावळत्या नीरजा परीच,माझा आभास,
ज्याला हवा वाटतो कोणाचा तरी,सहवास;
त्याला सुन्या गगनी,आज निरोपू दे,
तू नाही आली हे उषःकाली,आरोपु दे;

तुझी वाट आहे ,हाच ठोस आधार,
काही विस्कटल्या विचारी,हाच एक सुधार;
ह्याच भरल्या मनी,सांज खुलू दे,
बेभान सुटल्या वारी,आज झुलू दे;

ओठावर असले शब्द,किती दाबायचे,
इच्छित प्रणयी मनाला,किती ताबायचे;
मोहरीत काव्य फांदीला,जरा पाझरू दे,
हर शब्द पंक्तीस,तूच ओझरू दे;

सर्व अंगी मोकळा मी,स्वतःस वाटायचय
एकटे पणाला संपवून,संगवून थाटायचय;
कुठे आहेस तू ,कानी कुजबुज सरसरू दे,
तुझीच वाट आहे,आवाजून जीव भरभरू दे.

तूच नाही जिथं ,तिथं काय क्षेम आहे,
साधी गोष्ट आहे कि,तुझ्यावर प्रेम आहे;
त्या कोंदण वृत्तीस थोडं, फुलवून कळावू दे,
वाट पाहत्या दारी तुझं,पाउल वळावू दे;
चारुदत्त अघोर(११/५/११)