Author Topic: " एक छोटासा कवी एक छोटीशी कविता लिहीत होता "  (Read 1631 times)

Offline हणमंत तरसे

  • Newbie
  • *
  • Posts: 8
  • Gender: Male
  • मी राहिलो जरासा आता
" एक छोटासा कवी एक छोटीशी कविता लिहीत होता "

एका छोट्याशा दिव्याखाली
एका छोट्याशा काळोख्या  रात्रीमध्ये
तो एका छोट्याशा ओळीनच
न उमजणार छोटस गूढ लिहित होता
एक छोटासा कवी एक छोटीशी कविता लिहीत होता !!!

एका छोट्याशा कागदावर
एका छोट्याशा काळ्या पेनाने
तो एका छोट्याशा शब्दाचं
न उलगडणार  छोटस कोड लिहीत होता
एक छोटासा कवी एक छोटीशी कविता लिहीत होता !!!

एक छोठस हृदय
एका छोट्याशा दाठ इच्छेने
तो एक छोट्याशा भावनाच
न संपणारी छोटीशी ओढ लिहीत होता
एक छोटासा कवी एक छोटीशी कविता लिहीत होता !!!

एक छोटासा प्रियकर
एका छोट्याशा प्रियसेसाठी
तो एका छोट्याशा क्षणाच
न समजणार छोठस प्रेम लिहित होता
एक छोटासा कवी एक छोटीशी कविता लिहीत होता !!!

एक छोटासा जीव
एका छोट्याशा जीवनाची
तो एका छोट्याशा मृत्यूची
न दिसणारी छोटीशी वाट लिहीत होता
एक छोटासा कवी एक छोटीशी कविता लिहीत होता !!!

एक छोटस मन
एका छोट्याशा स्वप्नाच
तो एका छोट्याशा कहाणीच
न साकारणार छोटस अस्तित्व लिहीत होता
एक छोटासा कवी एक छोटीशी कविता लिहीत होता !!!

एक छोटासा आत्मा
एका छोट्याशा आठवणीची
तो एका छोट्याशा अंताची
न होणारी छोटीशी सुरुवात लिहीत होता
एक छोटासा कवी एक छोटीशी कविता लिहीत होता !!!
   
...........................................................हणमंत तरसे

Marathi Kavita : मराठी कविता

Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
mast lihili ahe chitishya kavichi chotishi kavita