Author Topic: "कवितेचा शेवट दुखःदच झाला"  (Read 1541 times)

Offline UNREVEALED MYSTERY

 • Newbie
 • *
 • Posts: 43
               
  "कवितेचा शेवट दुखःदच झाला" लहानपणी मी माझ्या
 जात होतो रस्त्यावरून रोजच्या
 अचानकपणे पैर माझे रुकले
 जेन्वा पहिले दृश्य सामोरले
 साधंच घर रस्त्यावरले
 पण आज पूर्ण कोसळलेले


 फक्त पायाच दिसत होता
 त्यावरच बसून मालक रडत होता
 
 विचारातच उत्तरला तो ....
" कुठून कोण जाने वादळ प्रेमाचे उठले
 त्यात मेहनतीचे माझे घर तुटले
 तिच्यासाठी बंगला बनवण्याचे स्वप्न पाहिले
 पण आता डोक्यावर छप्पर ही न राहिले 
 
 झाडे माझ्या अंगणातली
 पार उन्मळून पडली
 फुलांचे तर विचारूच  नका
 ती पार कोमेजली
 अवदशा पाहून इथली
 घरच अस्तित्वच मी विसरलो "

"वादळ हे अचानकपणे आले
 पण होते नवते ते सारेच घेऊन गेले
 मागमूस जरी मी न लागू दिला याचा दुसऱ्याले "

 मला वाटले ...
 मनातल्या मनात त्याचे मन
 तिच्याशी म्हणत असावे
 
" तू घरात माझ्या मैत्रीण  म्हणून आलीस
 अल्पावधीतच बेस्ट फ्रेंड झालीस
 अलिप्त एका व्यक्तीला मनुष्यात आणलस
 गोडी मैत्रीची तूच मला चाखवलास

 मैत्री केवळ निखळ मैत्रीच असते
 हे मला माहित नव्हते
 मैत्रीचे रुपांतर प्रेमात होते
 एवढेच माझ्या ज्ञानी होते
 इथेच कुठेतरी आपण भिन्न झालो
 मी मैत्रीला प्रेम समजून बसलो
 अन मैत्री तू प्रेमाला ........... "

 मला त्याची दुर्दशा कळली
 ह्याचे त्याला वाईट वाटले
 पण सुखावला तो , कोणीतरी
 मन मोकळे करायला भेटले

 पुढे म्हणाला
" साथ जरी सुटला आमचा
 प्रवास नाही फार लांबचा
 काय भरवसा आहे मृत्यूचा ?
 कधीही घेऊन जाईल प्राण .... तुमचा -आमचा .

  तरीही ..........
 पुनःउभारण्यासाठी घर झगडत आहे
 पण आता एकटेच आयुष्य  काढायचे
 असे मन म्हणत आहे
 खूप प्रयत्न करून पाया  वाचवला
 तो म्हणजे प्राण आपला
 करीन आत्मसात कधीही कला
 पण एक खरे ....
 वादळाने माझ्यातला भावनिक मनुष्य मेला "


 पण वाईट वाटते इतकेच मित्रा
 " दररोज बागडणारी माझ्या घरात मोकळे
 आज फिरकत सुद्धा  नाही इकडे
 वाट पाहणे तसे मीही आहेच सोडले
 घराच्या बांधणीतून  सवड नाही मले "
 

  सूचकपणे   मला म्हणाला ...
 " जर तुझे प्रेम अयशस्वी झालेना
 वाईट माणू नकोस कधी प्रेमाला
 दोष दे स्वतः च्या चुकांना
 किंवा गुन्हेगार ठरव  प्रेयसीला  "

 पण एक कर ...
 "सांभाळ स्वतः ला
 जपून ठेव स्वतः तल्या 'स्व ' ला  "

 एवढे बोलून तो लागला  कामाला...

 अनुभवाचे बोल ऐकून
 मी पण लागलो मार्गाला ...

 "त्याच्या अनुभवाचा मला आजपर्यंत उपयोग झाला
 आतापर्यंत मी सांभाळले माझ्या घराला
 पण असा एक क्षण आला
 त्याच्यासम माझापण स्वप्नमहाल उध्वस्त झाला
 पण ...
 माझे दुख ऐकण्या कोणी श्रोता न मिळाला
 म्हणूनच ह्या कवितेचा जन्म झाला
 अन ...
 पुन्हा एकदा कवितेचा शेवट दुखःदच झाला .......
 कवितेचा शेवट दुखःदच झाला ................. :(

 कविता वाचण्यासाठी आपला आभारी आहे ... काही सूचना असल्यास कळवावे .. धन्यवाद !!!
« Last Edit: February 25, 2012, 06:51:03 PM by UNREVEALED MYSTERY »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline MK ADMIN

 • Administrator
 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,514
 • Gender: Male
 • MK Admin
  • marathi kavita
Re: "कवितेचा शेवट दुखःदच झाला"
« Reply #1 on: February 19, 2012, 01:22:57 AM »
excellent mitra...chan jamla ahe..

Offline UNREVEALED MYSTERY

 • Newbie
 • *
 • Posts: 43
Re: "कवितेचा शेवट दुखःदच झाला"
« Reply #2 on: February 19, 2012, 01:49:28 AM »
dhanywad..... kavita majhich ahe  sir ...
« Last Edit: February 19, 2012, 06:49:45 PM by UNREVEALED MYSTERY »