Author Topic: प्रेमळ मैत्रिण..."  (Read 2018 times)

Offline yuvrajpatil001

  • Jr. Member
  • **
  • Posts: 56
प्रेमळ मैत्रिण..."
« on: June 13, 2013, 12:12:28 AM »
तू नटखट..खट्याळ
बालिश..पण थोडीशी वेडसर..,
आनंदाने ओसरणारी एक सर...

हास्य तुझे कुणालाही वेड लावणारे..,
बोल तुझे..ओठातून सरळ हृदयात उतरणारे...

नजर तुझी मोहून घेणारी..,
अदा तुझी कुणालाही फिदा करणारी...

सारखी असते..केसांच्या लाटांशी खेळत..,
कुणीही छेडलेल तुला नाही आवडत...

सगळ्यांच्याच खिळतात तुजवर नजरा..,
सांग ना ..तुज परी म्हणू कि अप्सरा...

मी स्वतःला खूप नशीबवान समजतो..
कि..तू मला भेटलीयेस..,
माझ्या आयुष्यात एक गोड आठवण
अन प्रेमळ मैत्रिण बनून आलीयेस...

जीवनात माझ्या अशी समावलीयेस..,
जसं..हृदयात कायमचं घर बनवून गेलीयेस..."


Yuvraj..."

Marathi Kavita : मराठी कविता


Offline rudra

  • Full Member
  • ***
  • Posts: 879
  • Gender: Male
  • आसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..
    • My kavita / charolya
Re: प्रेमळ मैत्रिण..."
« Reply #1 on: June 13, 2013, 11:30:13 AM »
mastach....