Author Topic: “दिवा मंदावू दे….” चारुदत्त अघोर©(१२/४/११)  (Read 1474 times)

Offline charudutta_090

  • Jr. Member
  • **
  • Posts: 185
  • Gender: Male
  • A fall leaf of autumn,....!!
ॐ साईं
“दिवा मंदावू दे….” चारुदत्त अघोर©(१२/४/११)
पहिल्या पावसाळी,हिरवळ नाहली,
दूर जमीन सर्वत्र,दवीत जाहली;
या दुर्मिळ रात्री,रातराणी गन्धवू दे;
तुझ्या कांती तेजावून,हा दिवा मंदावू दे.

वाटते आज रात्रही,थोडं मद्य प्याली,
मलाही ने तिच्या,बेधुंद मधुशाली;
या चढल्या नयनी,आज जरा धुन्दवू दे,
तुझ्या कांती तेजावून,हा दिवा मंदावू दे.

कितीही घोट घोटलो,तरी तहान राहिली,
तुला ओवाळून,हि रात्र वाहिली;
शुभ्रती तुझ्या जरा,चांदणी चांदवू दे;
तुझ्या कांती तेजावून,हा दिवा मंदावू दे.

फुलवून प्रीती आज,केशी फुलं गुंफिली,
किती गन्धीली तरी,एक सावली राहिली;
मादक तुझ्या नजरी,हि रजनी अंधावू दे;
तुझ्या कांती तेजावून,हा दिवा मंदावू दे.

नस नसी तुझ्या,एक सहल राहिली,
तुझ्या अंतरंगी,एक दिशा पाहिली;
या शारिरी यात्रून, एक क्षेत्र जनवू दे;
तुझ्या कांती तेजावून,हा दिवा मंदावू दे.

गार थंड हवेत या,एक उब इच्छावली,
पाहून तुला चेतनी,हि नियत दगावली;
अमिशी हे मधुर पाप, आज गुन्हावू दे,
तुझ्या कांती तेजावून,हा दिवा मंदावू दे.

या काळ्या रात्री,टिंबवून चांदणी शिंपली,
चंद्र समवे क्रीडावून,पाश कवेत जुंपली;
त्या मिलन साक्षी,हि रात्र छन्दावू दे;
तुझ्या कांती तेजावून,हा दिवा मंदावू दे.
चारुदत्त अघोर©(१२/४/११)


 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
एकावन्न अधिक अकरा किती? (answer in English):