(गझल लिहीण्याचा हा माझा पहिला प्रयत्न आहे. काही चुका असतील तर त्या नक्की कळवा.)
चालतो सोबत मी कूबड़यांचा सहारा कशाला?
रात्र आपलीच आहे चंद्राचा सहारा कशाला?
भिडू दे नजर तुझी नजरेला माझ्या,
फेकतेस उगाच त्या चोरट्या नजरा कशाला?
मनात तुझ्या मी असेन तर सांग
दाखवतेस मला फुकटचा नखरा कशाला?
वेनिनेच जीव घायाळ होतो माझा,
लावतेस केसात हा गजरा कशाला?
दरवळतो सुगंध तुझ्या श्वासांचा चोहीकडे,
ठेवतेस अंगनात हा मोगरा कशाला?
होऊ दे बात मनाची मनाशी,
देतेस त्यात नजरेचा इशारा कशाला?
ये अशी अलगद मिठीत माझ्या,
ठेवतेस प्रेमात लाजेचा पहारा कशाला?
'प्रवीण' प्रेमात पार बुडाला तुझ्या,
दाखवतेस त्याला जवळचा किनारा कशाला?
-प्रवीण राचतवार