Author Topic: बाजार (नात्या-गोत्यांचा)  (Read 1426 times)

Offline श्री. प्रकाश साळवी

  • Jr. Member
  • **
  • Posts: 229
  • Gender: Male
  • कवी प्रकाश साळवी
बाजार (नात्या-गोत्यांचा)
« on: February 20, 2014, 01:05:57 PM »
;)निशःब्द भावनांचा बाजार मांडला हा,
काट्या-कूटयांचा संसार मांडला हा,

आयुष्य जाळूनी जगतो उगाच मी,
नात्यांमध्ये दुरावा, कधी वाढतो हा,

सारे सुखाचे सोबती, न दुः खात साथ देती,
परी वेदनांचा वणवाच पेटतो हा,

निस्वार्थ - त्याग शब्द हे "कोशातले",
लवलेश त्यांचा न कोठे दिसे हा,

चौकडीतली हि नाती, ना भाऊबंदकी हि,
दीड दमडीचा मांडला पसारा हा,

फसवीच नाती,फसवीच गोती,
दिखावाच सारा, नात्या-गोत्याचा हा,

मरणात त्यांच्या किती "आसवे" ढाळती  हे,
सरणावर जळताच "वाट्यास" भांडती हे,

स्वरचित : कवी प्रकाश साळवी
[/b]
« Last Edit: February 20, 2014, 01:14:03 PM by prakashsalvi »

Marathi Kavita : मराठी कविता


nandan nangare

  • Guest
Re: बाजार (नात्या-गोत्यांचा)
« Reply #1 on: March 12, 2014, 02:27:17 PM »
duniya mayajal manuja jag jara
koi nahi apna manuja jan jara