Author Topic: नटखट (ना काना ना मात्रा)  (Read 1805 times)

Offline sachinikam

 • Jr. Member
 • **
 • Posts: 169
 • Gender: Male
नटखट
(ना काना  ना मात्रा)


घटधर गवळण चलत चलत
नटखट मदन पथ अडवत
भयवदन सकळ रक्ष रक्ष वदत
बल कर घट पकडत

चल खल नटखट  हट पळत
नगर हजर मज न छळत
वनचर धडपड मज न कळत

घट धवलरस मज हव भक्षत

पवन वहन पळभर घनजल बरसत
नगर हजर पद पळत पळत

घट अध पडत
उदरभर रस भक्षत
गवळण नयनजल रडत रडत
नटखट कमलनयन सहगण हसत.

कवितासंग्रह: मुखदर्पण
कवी: सचिन निकम
पुणे
९८९००१६८२५
https://www.facebook.com/Mukhdarpan/photos/pb.134789130036466.-2207520000.1427694177./134790526702993/?type=1&theater


Marathi Kavita : मराठी कविता


Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

अनघा

 • Guest
Re: नटखट (ना काना ना मात्रा)
« Reply #1 on: April 06, 2015, 12:21:17 AM »
ना काना ना मात्रा
शब्दांची इथे जमलीये जत्रा
ठकीच्या लग्नाला विघ्ने सत्रा
दूरवर कोणीतरी भुंकतोय्‌ कुत्रा

Offline sachinikam

 • Jr. Member
 • **
 • Posts: 169
 • Gender: Male
Re: नटखट (ना काना ना मात्रा)
« Reply #2 on: April 06, 2015, 10:48:33 AM »
नटखट ह्या कवितेत एकाही शब्दाला काना मात्रा उकार वेलांटी किंवा अनुस्वार नाही.
तरीही ह्या कवितेतून यमुनाकाठचे एक रमणीय दृश्य वर्णिले आहे.
गवळणी दही दूध लोणी घेउनि मथुरानगरीस यमुनाकाठाने चालल्या आहेत.
नटखट कृष्ण आपल्या सवंगड्यांसह त्यांचा रस्ता अडवितो आणि दही दूध लोणी देण्याची मागणी करतो.
त्या नकार देतात मग काय वनचर कृष्ण त्यांचा हात जबरदस्तीने पकडतो पण त्या तशाच पळू लागतात.
त्या कृष्णाला खूप विनवणी करतात. पण तो ऐकेल तर खर.
ह्या सगळ्या ओढाओढीत घट खाली पडतात आणि दही दूध लोणी सांडते.
गवळणी रडू लागतात. कान्हा आणि सवंगडी दही दूध लोणी चापुन हाणतात आणि हसू लागतात.
« Last Edit: April 06, 2015, 10:49:19 AM by sachinikam »

Offline sachinikam

 • Jr. Member
 • **
 • Posts: 169
 • Gender: Male
Re: नटखट (ना काना ना मात्रा)
« Reply #3 on: April 06, 2015, 11:38:49 AM »


राधिका

 • Guest
Re: नटखट (ना काना ना मात्रा)
« Reply #4 on: April 06, 2015, 06:25:56 PM »
हटातटाने पटा रंगवुनि जटा धरिशि कां शिरी ।
मठाची उठाठेव कां तरी ॥

वनांत अथवा जनांत हो कां मनांत व्हावे परि ।
हरीचें नांव भवांबुधी तरी ॥

काय गळ्यांत घालुनि तुळशीची लांकडे ।
ही काय भवाला दूर करितिल माकडें ।
बाहेर मिरविशी आंत हरिशी वांकडे ।
अशा भक्‍तिच्या रसा-रहित तूं कसा म्हणविशी बुधा ।
हरिरस सांडुनि घेशी दुधा ॥

--रामजोशी

Offline sachinikam

 • Jr. Member
 • **
 • Posts: 169
 • Gender: Male
Re: नटखट (ना काना ना मात्रा)
« Reply #5 on: April 13, 2015, 09:49:51 AM »
राधिका आणि अनघा, कविता वाचल्याबद्दल धन्यवाद.  आपणास नक्की काय म्हणायचे आहे हे समजले नाहि. अधिक माहितीसाठी आपण माझ्या नंबरवर थेट सुसंवाद साधू शकता.

Offline sachinikam

 • Jr. Member
 • **
 • Posts: 169
 • Gender: Male
Re: नटखट (ना काना ना मात्रा)
« Reply #6 on: September 05, 2015, 10:13:28 AM »
नटखट कान्हा

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
पाच अधिक नाऊ अधिक शून्यं  किती ? (answer in English number):