पागल.........( गझल )
चाफेकळी तुझे गं, आहे जणू हे नाक,
प्रेमात तुझ्या मी पागल, वेडा म्हणती लोक...
स्मरून तुला गं प्रिये, काटतो मी हि रात,
विरहात मला या, का? छळतो हा वात....
आसवांत माझ्या, तुझी याद गं बुडाली,
वालवंतात कशी हि , सये कळी उमलली....
कसा विसरू तुला मी, आठवं आवरेना,
झाले तुझे गं पाषाण, का? हे मन पाझरेना....
आता तरी जीवनी, येऊन साथ तू दे ,
नाहीतर कुडीतून, हा जीव काढून घे.....
तुझ्याविन तनी या, नाही जीव - चेतना,
दाह- विरह आता, या कुडीला सोसवेना....
मानले मी तुला, त्या ईशाहून मोठे,
होऊ नकोस देऊ, मज स्वप्नं तू खोटे.........
चाफेकळी तुझे गं, आहे जणू हे नाक,
प्रेमात तुझ्या मी पागल, वेडा म्हणती लोक...
@@@ दिगंबर @@@