Author Topic: दारापाशी ( कल्पेश देवरे )  (Read 953 times)

Offline Kalpesh Deore

  • Jr. Member
  • **
  • Posts: 88
  • Gender: Male

दारापाशी

अवघडलेलं माझं मन
आठवे मला प्रत्येक क्षण
घालवलाय कसं लहानपण
माझ्या दारापाशी

हाक आईची जातांना
"काळजी घे रे " म्हणतांना
उभी राहून मज पाहतांना
असे दारापाशी

शिक्षणाची मज गोडी फार
पुण्याची स्वारी झाली तयार
मग निघे अश्रुंची धार
माझ्या दारापाशी

बहिणीच्या लग्नाचा मंडप
हाती धरलेले ते चहाचे कप
तश्याच आवाज निघे रप-रप
माझ्या दारापाशी

काळजी घेणारी घरच्यांची
नाते जोडणारी मनांची
वाट पाहतोय तिची
माझ्या दारापाशी
 
कवी - कल्पेश देवरे