Author Topic: रम्य संध्या ....(कल्पेश देवरे)  (Read 1192 times)

Offline Kalpesh Deore

 • Jr. Member
 • **
 • Posts: 88
 • Gender: Male
रम्य संध्या


रम्य संध्या त्या दिवसाची
येते का आठवण माझ्या प्रेमाची?

पाऊसाच्या झऱ्यात
नद्यांच्या खोऱ्यात
वाऱ्याच्या बोलात
होते किलबिल पक्ष्यांची


रम्य संध्या त्या दिवसाची
येते का आठवण माझ्या प्रेमाची?

हिरव्या नदीत नाहुनी
उंच पर्वतात खेळुनी
नभात जातो रवी निघुनी
येते हळूच वाट चंद्राची


रम्य संध्या त्या दिवसाची
येते का आठवण माझ्या प्रेमाची?

झुलते डुलते
मन हळूच फुलते
नं कळे काय पाहते ?
तर पाहते वाट तुझ्या येण्याची


रम्य संध्या त्या दिवसाची
येते का आठवण माझ्या प्रेमाची?


रम्य संध्या त्या दिवसाची
येते का आठवण माझ्या प्रेमाची?

कवी - कल्पेश देवरे

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
chan kavita

Offline Kalpesh Deore

 • Jr. Member
 • **
 • Posts: 88
 • Gender: Male
धन्यवाद केदार सर...