Author Topic: ती कशी असेल? (कल्पेश देवरे)  (Read 2797 times)

Offline Kalpesh Deore

 • Jr. Member
 • **
 • Posts: 88
 • Gender: Male
ती कशी असेल?

पहिल्याच भेटीत पाहून लाजणारी असेल
की पाहताच मला पाहत राहणारी असेल

नजरेने नजरेशी बोलणारी असेल
की खाली नजर ठेवून शांत बसणारी असेल

फुलासारखी कोमळ हसणारी  असेल
की रागाने सारे घर डोक्यावर घेणारी असेल

घरच्या सर्वांशी खेळी मेळी ने राहणारी असेल
की त्यांच्याच नावाने बोंबाबोंब करणारी असेल

मनसोक्त माझ्यावर प्रेम करणारी असेल
की मला पाहताच घरात गोंधळ घालणारी असेल

माझ्या आवडीचे पदार्थ बनवणारी असेल
की न आवडते तेच माझ्यापुढे मांडणारी असेल

माझ्या इछ्या, दु:ख, प्रेम समजणारी असेल
की आपल्याच व्यथांची कहाणी सांगणारी असेल

पडत्या काळात मदतीचा हात देणारी असेल
की दु:खाचा डोंगर पाहून साथ सोडणारी असेल

कुणास ठाऊक ती कशी असेल ?

कवी - कल्पेश देवरे   

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
पहिल्याच भेटीत पाहून लाजणारी असेल
नजरेने नजरेशी बोलणारी असेल
फुलासारखी कोमळ हसणारी  असेल
घरच्या सर्वांशी खेळी मेळी ने राहणारी असेल
मनसोक्त tuझ्यावर प्रेम करणारी असेल
tuझ्या आवडीचे पदार्थ बनवणारी असेल
tuझ्या इछ्या, दु:ख, प्रेम समजणारी असेल
पडत्या काळात मदतीचा हात देणारी असेल
 
 :)

Offline Kalpesh Deore

 • Jr. Member
 • **
 • Posts: 88
 • Gender: Male
तुम्हालाही माहित आहे कि आजच्या युगात हे सगळं एका मुलीत मिळणे कठीण आहे...पण माझ्यासारखी तुमचीही कल्पना छान आहे....

PINKY BOBADE

 • Guest
Kavita kup mastt aahe

Tuji Honari bayko Chanch Asel Nako Kalaji karu.......

Offline Kalpesh Deore

 • Jr. Member
 • **
 • Posts: 88
 • Gender: Male
तुझ्या सारखा विचार काणारी जरी असली तरी खूप आहे माझ्यासाठी .....धन्यवाद

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दहा गुणिले नाऊ  किती ? (answer in English number):