ऐ ताई....
या वर्षीच्या राखीला तरी, येशील ना गं ताई,
आजच मस्त साडी आणली, घेशील ना गं ताई..
ही नाही आवडली तर, तुझ्या पसंतीची घेऊ,
प्रॉमिस! शॉपिंगला आपण सोबतच जाऊ..
ओवाळणीत सांग ना गं, तुला काय देऊ ताई,
खूप झाला अबोला, आता बस कर गं बाई..
राखीच्या दिवशी, हाताला राखी नसते,
प्रत्येकाच्या राखीत, तुझाच चेहरा दिसते..
दिवाळीचा दिवस, खाण्यात जसा तसा जाते
भाऊबीजेची तेवढी अक्षद, फार त्रास देते..
टॉम आणि जेरी सारखी,लहानपणी भांडायची,
बाबांकडून चॉकलेट साठी,पैसेही काढून द्यायची..
खूप दिवस झाले गं, भाचीला पाहिलच नाही,
हृदय भरून आलं, आज रहावलचं नाही..
वाट पाहीन तुझी, सरप्राईज तरी दे,
पण यंदाच्या राखीला, ताई तू नक्की ये..
राजेश शेषराव पोफारे
सेंदरी, त. देवळी जि. वर्धा
9307010387