आहेस तु जीवनी माझ्या
(Version 1.2)
आहेस तु जीवनी माझ्या
हे जेव्हा जेव्हा मी स्मरतो
मन भरते आनंदाने
हृदयाला भरती येते !!धृ!!
तुझ्यामुळे सखे गं
मम जीवन फुलून गेले
मनाच्या आकाशात
इंद्रधनु खुलून गेले
तुच एक आधार या मना देतच असते
प्रिये तुजविण मजला
मुळीच करमत नाही
जाता दूर जरासी
हुरहुर मनाला होई
विरह तुझा क्षणाचा मजला असह्य होतो
तु असता मम जीवनी
आणि काय करु मागणी
मी आभारी देवा तुझा
दिली अशी मज सजनी
ही सोबत अशीच ठेवा ही मन कामना करते
---राजेश खाकरे
Mo.7875438494
rajesh.khakre@gmail.com
(माझ्या कविता इमेज स्वरुपात मिळविण्यासाठी whatsapp वर विनंती पाठवा)