Author Topic: ******* स्वप्न ******  (Read 1610 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
******* स्वप्न ******
« on: June 08, 2014, 08:35:43 AM »
******* स्वप्न ******
======================
स्वप्नातही असे स्वप्न नसते पाहिले
जे तुझ्या रुपात सत्यात उतरले
पहात होतो चांदण्या नित्य आभाळात
त्यांना माझ्या ओंजळीत पाहिले

पाहू तरी कसे स्वप्न मी
ज्यावर माझाच विश्वास नव्हता
तरी आयुष्याच्या या वळणावर
सखे प्रेम तुझे भेटले

इंद्रधनुचे रंग नभीचे
तुझ्या डोळ्यांत मी पाहिले
तू भेटल्यावर माझे मन
स्वप्नात रमू लागले

नव्हती जाण मनास स्वप्नांची
तू स्वप्नांचे रंग मज दावले
इतका लागला लळा तुझा
मन स्वप्नांचे होऊन जगू लागले

जरी असलीस दूर तू माझ्यापासून
या स्वप्नांनीच मज तारले
तुझ्या विरहाच्या वेदना विसरून
स्वप्नांनीच जगणे बेधुंद केले
====================
संजय एम निकुंभ , वसई
दि. ८.६.१४ वेळ : ८.०० स .

Marathi Kavita : मराठी कविता