Author Topic: *** पैज ***  (Read 771 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
*** पैज ***
« on: February 21, 2013, 07:22:28 PM »
***  पैज  ***

...................................

तुझा प्रत्येक प्रयत्न

मी हाणून पाडत होतो

मला फसवण्याचा

तुझा प्रत्येक डाव

उधळत होतो मी

मला गटवण्याचा

मला कळत  होतं

हे फास आहेत

मला जाळ्यात ओढण्याचे

तुझे सारे कसब

पणाला लावलेस तू

मला भुरळ पडण्याचे

पण एकच चूक झाली

तुझ्यासोबत डोळ्यात डोळे घालून

बघण्याची पैज लावली

इतक्या खोल डोहात डूबलो

कि तुझ्या मनाची सुंदरता

माझ्या नजरेस पडली

इतकं सुंदर मन पाहून

मन हरखून गेलं

अन माझ्या प्रितीच पानं

तुझ्या ओंजळीत टाकून दिलं

भले असू दे

मी पैज हरली

पण त्यामुळेच मला

माझी प्रीत भेटली .                                कवी : संजय एम निकुंभ , वसई

                             दि. २१.०२.२०१३ वेळ : ६.३० संध्या .

http://www.facebook.com/SanjayNikumbhPoems?ref=hl

 

Marathi Kavita : मराठी कविता