Author Topic: *** शपथ अशीही ....... ***  (Read 1217 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
*** शपथ अशीही ....... ***
« on: March 12, 2013, 07:14:25 PM »
*** शपथ अशीही ....... ***

 .............................................

 टवकारून बघतात

 तुझे गाल

 माझ्या अधरांकडे

 आसक्त अन

 अधीर होऊन

 पाहतात माझ्या नजरेकडे ........

 माझी खिळलेली नजर पाहून

 स्पर्श भावनेन

 अगोदरच लाल होतात

 त्या पहिल्या स्पर्शाची धुंदी

 दिसते मला

 गालाच्या मनावर

 गुलाबी अधरांचा गोडवा

 दिसतो त्यांना

 हाकेच्या अंतरावर

 माझ्या मनातला समुद्रही

 असतो खवळलेला

 त्या गालांच्या नजरेनं मी वेढलेला ......

 पण संयमाचा बांध

 न ओलांडता

 मी तुझा निरोप घेतो

 दिसतात तुझ्या नजरेत

 उदासवाणे भाव

 मी दूर जातांना

 पण मी तुला

 कधीच व्यक्त न केलेली

 शपथ आडवी येते मला ..........

 मी ठरवलंय

 पहिला स्पर्श अधरांचा

 करेन तुझ्या पावलांना

 कारण तुझी पावलं

 पडली जीवनात

 अन जगण्याला माझ्या

 अर्थ आला

 प्रीत हि वेडी असते

 याचा मज

 साक्षात्कार झाला .

 संजय एम निकुंभ , वसई

 दि. ११.०३.२०१३ वेळ : ५.३० संध्या .

Marathi Kavita : मराठी कविता