Author Topic: *** मिरवणूक ***  (Read 908 times)

Offline SANJAY M NIKUMBH

 • Full Member
 • ***
 • Posts: 502
*** मिरवणूक ***
« on: April 14, 2013, 02:04:39 PM »
*** मिरवणूक ***

 ………………………………

 मिरवणूक चालली होती

 गतकाळातले पोशाख परिधान करून

 हातात भले अन नजरेत क्रूरपणा

 साखळीदंडानी जखडलेला तो

 खेचत खेचत नेत होते त्याला भर रस्त्यावरून

 आजूबाजूला बघ्यांची गर्दी

 या कडेला तू त्या कडेला मी

 तुझं लक्ष पूर्ण त्या मिरवणुकीकडे

 माझं लक्ष तुझ्या चेहऱ्यावर खिळलेलं

 " येशूच " रूप धारण केलेल्या त्या माणसाकडे

 तू भेदरलेल्या नजरेनं बघत होतीस

 त्याला खेचत असतांना

 तो यातनांचे हावभाव करून विव्हळत होता

 तस तसे तुझ्या डोळ्यात पाणी जमा व्हायला लागलं

 त्याला नेलं वधस्तंभाकडे

 त्याचे हातपाय बांधून खिळे मारायला सुरवात झाली

 अन तुझ्या डोळ्यातून अश्रुंचे पाट वाहू लागले

 तो सगळा देखावा आहे हे माहित असूनही

 मी स्तब्धपणे सारं पहात उभा

 त्या येशूच्या जागी मीच असल्याचा भास झाला

 तो गरीबांचा कैवारी , वारांगनेचा मित्र म्हणून

 प्रस्थापितांनी त्याला हि शिक्षा दिली

 अन मरणानंतर त्याला देवत्व बहाल केलं लोकांनी

 पण माझा काय दोष

 मला कां चढवलसं तू क्रुसावर

 तुझ्या कोमल हातांनी खिळे मारतांना

 भावना गोठून कशा गेल्या तुझ्या

 तेव्हा कां नाही आलं तुझ्या डोळ्यात पाणी

 माझा गुन्हा इतकाच की

 ती तुझ्यावर स्वतःपेक्षा जास्त प्रेम केलं

 देवाच्याही पुढे वरच्या स्थानावर

 माझ्या मनात तुला नेऊन बसवलं

 प्रिती सुंदर असते हे तुझ्यामुळेच कळलं मला

 प्रितीशी ओळख करून माझ्या रोमारोमांत भरून

 माझं जगणं बदलवणारी तूच होतीस

 मी तर निरागस भक्ती करत होतो अपेक्षा न ठेवता

 तरी आपल्याच प्रेमाला मारतांना तुझे हात कापले नाहीत

 खऱ्या प्रेमाची एवढी मोठी सजा कुणाला मिळाली नसेल

 पण तू हे विसरते आहेस

 मी मेल्यावरही माझ्या आत्म्यात तुझीच प्रिती असेल

 येशु म्हटला देवा यांना माफ कर

 मी म्हटलं देव हिला सुखी कर .

 कवी : संजय एम निकुंभ , वसई

 दि. १.४.१३ वेळ : ६. ३० स .

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Shrikant R. Deshmane

 • Full Member
 • ***
 • Posts: 501
 • Gender: Male
 • कविता म्हणजे कागद, लेखणी अन् तू...
Re: *** मिरवणूक ***
« Reply #1 on: April 15, 2013, 09:36:38 AM »
lai bhari kalpana aahet sanjayji...
apratim aahe..
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

Offline SANJAY M NIKUMBH

 • Full Member
 • ***
 • Posts: 502
Re: *** मिरवणूक ***
« Reply #2 on: April 15, 2013, 05:21:28 PM »
thanx