Author Topic: ***प्रत्येक मुलाचं असच का बरं असत ???***  (Read 2714 times)एकदा का माझ्याकडे बघुन,
ती थोडी हसली...
तिच्या त्या गोड हसण्यान ती,
माझ्या मनात बसली...

मनात मी सारखेच,
तिचेच विचार घोळू लागलो... 
तिचाच विचार करत मी,
रात्र रात्र जागू लागलो...

काही झाल तरी एक दिवस,
हिम्मत करायच ठरवल...
जे काय नशीबात असेल,
त्याला तोंड द्यायच ठरवल...

एके दिवशि मी तिला,
पाठलाग करुन गाठले...
अडखळत अडखळत सर्व,
सांगुनटाकल मनातले...
मला तु आवडतेस,
माझ्याशी मैत्री करशील का ?...
ती खालच्या मानेनेच बोलली,
मी आत्ता नाही सांगु शकत,
मला थोडा वेळ देशील का ?...

दुसर्या दिवशी मी तिची,
त्याच ठिकाणी वाट पाहत बसलो...
पण ती काही आली नाही,
काय बरं झाल असेल हाच विचार करत बसलो...

तिसर्या दिवशी तिला,
सामोरी येताना पाहिली...
मी पुढे गेलो,
मी काही बोलायच्या आतच ति नाही म्हणाली...

मग पुढे काय,
व्हायचं तेच झाल...
मनात रंगवलेल स्वप्न,
क्षणातच तुटल..

प्रत्येक मुलाचं असच का बरं असत?

ती येत असताना रिमझीम पाऊस नादत असतो...
पण ती जाताना मात्र तो,
धो धो कोसळत असतो...

© कौस्तुभ

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Maddy_487

  • Jr. Member
  • **
  • Posts: 145
  • Gender: Male
ती येत असताना रिमझीम पाऊस नादत असतो...
पण ती जाताना मात्र तो,
धो धो कोसळत असतो...

mast aahe