*** प्रियकर ***
अजूनही पाणावते कड डोळ्याची,
अन मन गहिवरून येते,
जेव्हा तुझ्या आठवांची ज्योत,
नकळत फडफडू लागते...........
सुटतो मनाचा संयम,
अन ओठ अबोला धरती,
बोलायचे तर खूप असते,
पण शब्द अपुरे पडती.....
कुठवर करू सहन मी,
या यातना अन वेदना,
केव्हाच झाले गतप्राण मी,
न ऊरी राहिली चेतना....
आणणार आहेस मजसाठी ?
अमर ती संजीवनी,
का? जडला जीव तुझ्यावर,
अन दुःखे घेतली बोलावूनी....
विरह मनाचा ठाव घेई,
तरले अश्रू नयनी,
फुकीच आले, फुकीच मेले,
न लाभले सुख जीवनी.....
नाही समजले तुला इशारे,
न समजली प्रीती,
तुझ्याखातर सजना मी रे,
जाळली जीवनवाती ( ज्योती )...
सांगणार होते तुला साजना,
प्रीत माझ्या मनातली,
त्याच वेळी एक मुलगी,
तुझाबरोबर दिसली.......
मला पाहता, ओळख तिची,
दिली तूच करोनी,
प्राणाहून प्रिय तुला ती,
कोठे भेटेल अशी कामिनी?
एक सांगणे तुला दिगंबर,
प्रेम जीवे-भावे, कर तिच्यावर,
तुझ्यासाठी मी जग सोडले अन,
तु झाला तिचा प्रियकर........
झाले गेले सर्व विसर,
असेल मजसम ती भोळसर,
प्रेम जीवे-भावे, कर तिच्यावर,
बन प्रेमळ तिचा प्रियकर....
अभागिन आहे मी पामर,
एकाकी हे जीवन कुठवर,
लाभो उदंड आयुष्य त्यांना,
हेच मागणे आता ईश्वर .....
.... दिगंबर.......