Author Topic: तोच पाऊस ***  (Read 1221 times)

Offline Aishu

  • Newbie
  • *
  • Posts: 32
तोच पाऊस ***
« on: November 11, 2014, 08:09:48 PM »
तू अनं मी आपण कीतींदा दोघेही पाहिलोय ह्या पावसाला....

माझ्या अंगणात कोसळताना
तूझ्या घरावर कोसळताना
तर कधी झाडांवरून अलगद बरसताना
तर कधी पारंब्यांच्या फांद्यातून डुलत झुलत खाली भुईवर कोसळताना

पण आठवतो मला आपला अजून तोच पाऊस
तू अनं मी एकमेकांपासून दूरावताना
एकमेकांसाठी एकमेकांच्या डोळ्यातून झरताना
ह्या आपल्या आठवणीत मी शहारते मी बहरून येते

तोच पाऊस आजही मी माझ्या देहावर घेऊन जगते
तोच पाऊस तोच मातीचा दरवळणारा सुगंध आजही मी माझ्या श्वासात घेऊन जगते

ऐश्वर्या सोनवणे  मुंबई।

Marathi Kavita : मराठी कविता