Author Topic: ** धुंदी प्रेमाची **  (Read 1306 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
** धुंदी प्रेमाची **
« on: May 11, 2013, 10:45:48 PM »
** धुंदी प्रेमाची **
-------------------------
नको रे मना तू
या प्रेमाच्या वाटेला जाऊ
प्रेम म्हणजे बाजारातला
नाही रे खाऊ

एक तर तू आहेस भावनाशील
हे जग नाही तसं
उगीच प्रेमात पडून
होईल तुझं हसं

होतं बजावलं मनाला
नको जाऊस या वाटेला
नियतीच्या मनी काय असतं
कळलेय कां कुणाला

प्रेमात पडायचं नाही
हे मी ठरवलेलं होतं
पण नियतीने अगोदरच
काही लिहून ठेवलं होतं

ज्याची भीती वाटतं होती
तेच जीवनात घडून गेलं
तू आलीस आयुष्यात
मन प्रेमात पडून गेलं

आता फक्त तुझा होऊन
प्रत्येक क्षण जगतो मी
जे प्रेम नकोसं होतं
त्याच्याच धुंदीत हरवलोय मी .

संजय एम निकुंभ , वसई
दि . १० . ५ . १३ वेळ : १० . ०० रा .

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Ankush S. Navghare, Palghar

  • Full Member
  • ***
  • Posts: 779
  • Gender: Male
  • तु मला कवी बनविले...
Re: ** धुंदी प्रेमाची **
« Reply #1 on: May 12, 2013, 07:53:46 PM »
Sundar...