Author Topic: ** प्रेमाच्या वाटा **  (Read 1283 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
** प्रेमाच्या वाटा **
« on: May 12, 2013, 12:16:57 AM »
** प्रेमाच्या वाटा **
---------------------------
प्रेमाच्या वाटा कुणासही
उगीच गवसत नसतात
हातांच्या हस्त रेषांवरच
त्या रेखाटलेल्या असतात
कळून जातं मनास
जेव्हा भेटतो तो चेहरा
अलगद चोरून नेतो मन
ठेवा कितीही पहारा
किती भेटतात चेहरे
काही आवडतातही मनास
पण जो हृदयास भावतो
तो एखादाच असतो खास
कितीही विसरायचं ठरवलं
तो विसरता येत नाही
पापणीत त्याला घेतल्याशिवाय
निजही जवळ घेत नाही
कुणासही या प्रेमाच्या वाटा
आयुष्यात मिळत नाही
ज्याच्या ललाटी असते प्रेम
भेटल्याशिवाय रहात नाही .

                                           कवी : संजय एम निकुंभ , वसई
                                          दि. ११ . ५ . १३  वेळ : ११ . ५० रा .   Marathi Kavita : मराठी कविता


Offline Ankush S. Navghare, Palghar

  • Full Member
  • ***
  • Posts: 779
  • Gender: Male
  • तु मला कवी बनविले...
Re: ** प्रेमाच्या वाटा **
« Reply #1 on: May 12, 2013, 07:46:33 PM »
Sanjay ji ...
प्रेमाच्या वाटा कुणासही
उगीच गवसत नसतात
हातांच्या हस्त रेषांवरच
त्या रेखाटलेल्या असतात

Hya oli ekadam kharya ahet karan mi hastarekha tadnya ahe...

Kavita khup sundar ahe...