Author Topic: ** तू जातांना **  (Read 1997 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
** तू जातांना **
« on: May 13, 2013, 12:04:50 AM »
**   तू जातांना   **
-----------------------------
तू जेव्हाही निघतेस
माझा निरोप घेऊन
तेव्हा तुझ्या डोळ्यात
मी मला पाहतो
तू थोडं अजून
थांबावस म्हणून
तुझं मन ओळखून
हात मी धरतो
तेव्हा नजरेस नजर
तू माझ्या भिडवतेस
डोळ्यात डोळे घालून
वेड्यासारखी बघतेस
येईन रे मी पुन्हा
नजरेनच मला सांगतेस
जाऊ दे ना आता
पुन्हा भेटू म्हणतेस
मी हि सांगतो नजरेनच
चल जा आता
तेव्हा मात्र तुझे
पाऊल ना पुढे पडते
प्रत्येक वेळेस जातांना
असेच का गं घडते
तू नजरेआड होईपर्यंत
मन तुला पहात रहाते .

                                    कवी : संजय एम निकुंभ , वसई
                                   दि. १३ . ५ . १३  वेळ : ११ . ५० रा .     

                                     

Marathi Kavita : मराठी कविता