Author Topic: ** बंधन **  (Read 1746 times)

Offline SANJAY M NIKUMBH

 • Full Member
 • ***
 • Posts: 502
** बंधन **
« on: May 25, 2013, 03:38:36 PM »
** बंधन **
---------------------
आवडतं मला
बंधनात रहायला
तुझ्या प्रेमपाशात
अडकून जगायला
तुझ्यात गुंतून राहिल्यानं
जगाशी फारकत घेतो
कुठल्याही वादळाला
हसत परतावून लावतो
कुठलाही मोह मनास
कधीच शिवत नाही
तुझ्याशिवाय दुसरं काही
त्यास उमगत नाही
तू जवळ नसूनही
तुझ्यासोबत जगत रहातो
दिसतो जरी एकटा
एकटा कधीच नसतो
तुझं हे बंधनच
मला जगणं शिकवतं
कुठल्याही क्षणात
मन हसरं ठेवतं .
कवी : संजय एम निकुंभ , वसई
दि. २३ . ५ . १३ वेळ : ७ . ५० स.

Marathi Kavita : मराठी कविता


Offline sweetsunita66

 • Full Member
 • ***
 • Posts: 862
 • Gender: Female
 • प्रेमा साठी जगणे माझे ।
Re: ** बंधन **
« Reply #1 on: May 25, 2013, 04:26:19 PM »
छान कविता !!!! :) :)

Offline SANJAY M NIKUMBH

 • Full Member
 • ***
 • Posts: 502
Re: ** बंधन **
« Reply #2 on: June 06, 2013, 10:06:14 PM »
thanx sunita