Author Topic: ** आरोप **  (Read 1207 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
** आरोप **
« on: May 25, 2013, 04:36:28 PM »
** आरोप **
-------------------
तुझ्या सुंदर मनाचं
माझ्या मनाला
इतकं वेड लागलं की
तुला अन मला
शरीरही आहे
हेच मन विसरून गेलं
मी फक्त झुलत राहिलो
तुझ्या मनाच्या झोपाळ्यावर
बेभान होत राहिलो
त्याच्या सुंदर गंधावर
म्हणून एकांतातल्या क्षणातही
कधीही माझ्या मनात
शरीर वासना उफाळली नाही
उलट जेव्हाही वाटलं मला
तुझं मन निसटत चाललंय
तेव्हा मीच सावरलं त्याला
कारण मला भावनेत
डुंबून रहायला आवडतं
शरीराचं काय
ते एक होतील ना होतील
पण मन अन आत्म्याचं
गुंतून जाण आवडतं
मला आरोप पुसून टाकायचाय
माझ्यावर वर्षानुवर्ष लादलेला
की मला फक्त शरीर हवं असतं
फक्त शरीर हवं असतं .

कवी : संजय एम निकुंभ , वसई
दि. २३ . ५ . १३ वेळ : ८. १५ स.

Marathi Kavita : मराठी कविता