Author Topic: ** पाश **  (Read 766 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
** पाश **
« on: May 29, 2013, 10:28:39 PM »
** पाश **
------------------------
तू आवलळेस पाश
माझ्याभवती असे
तूच सांग प्रिये
ते सोडवू कसे ………
तुझी भिरभिरती नजर
वार करी मनावर
इतुके मधुर वार
मी परतावू कसे
तू आवलळेस पाश
माझ्याभवती असे ……….
केस तुझे कुरळे
मन माझे भाळले
गुंतलेल्या अंबाड्यातून
बाहेर काढू कसे
तू आवलळेस पाश
माझ्याभवती असे ……….
अधर जणू पाकळ्या
गुलाबी रंग ल्यालेले
या नशेतून मन
मी सावरू कसे
तू आवलळेस पाश
माझ्याभवती असे ……….
तुझं गोड हसणं
खूप सुंदर दिसणं
या मोहाला सखे
मी आवरू कसे
तू आवलळेस पाश
माझ्याभवती असे
तूच संग प्रिये
ते सोडवू कसे.
  https://www.facebook.com/SanjayNikumbhPoems?ref=hl                               
 कवी : संजय एम निकुंभ , वसई
 दि. १३ . ५ . १३  वेळ : ८ . ५० स.   

Marathi Kavita : मराठी कविता