Author Topic: **आठवणींचा पाऊस**  (Read 1174 times)

Offline धनराज होवाळ

  • Jr. Member
  • **
  • Posts: 232
  • Gender: Male
  • माझ्या लेखणीतून..
    • Facebook
**आठवणींचा पाऊस**
« on: June 08, 2015, 07:49:36 AM »
***आठवणींचा पाऊस***

अजुन ही बरसतोच आहे,
तुझ्या आठवणींचा पाऊस..
हृदय माझं म्हणतं सखे,
मला सोडून नको जाऊस..!!

अगं तुच माझी प्रेयसी,
अन् तुच माझी अप्सरा..
तुच आहेस ती परी,
जिने दिला हृदयी मज आसरा..!!

तुझी आठवण पण ना,
पावसाच्या सरी प्रमाणे येते..
अलगद अशी येते अन्,
अंगाला मस्त झोंबूंन जाते..!!

शब्दांनी ना सही पण,
डोळ्यांनी तु बोलून गेलीस..
जाता जाता माझ्या हृदयात,
एक मोरपीस ठेऊन गेलीस..!!

तुझ्या आठवणींचं ते मोरपीस,
मी अजुनही जपुन ठेवलंय..
आपल्या प्रेमाची साक्ष म्हणुन,
जीवनाच्या माळेत ओवलंय..!!

आज त्या माळेचे मोती,
अश्रू बणुन बरसले आहेत..
तुझ्या आठवणींच्या पावसात,
ते थेंबच बाकी उरले आहेत..!!

तुझ्या आठवणींचा पाऊस,
मला नेहमीच हवासा वाटतो...
त्याचा प्रत्येक थेंब हा,
नेहमीच नवा नवासा वाटतो...!!!
-
स्वलिखीत...
प्रेमवेडा राजकुमार
9970679949

Marathi Kavita : मराठी कविता