Author Topic: **आमचं खोटं नाटं भांडणं**  (Read 1006 times)

Offline धनराज होवाळ

  • Jr. Member
  • **
  • Posts: 232
  • Gender: Male
  • माझ्या लेखणीतून..
    • Facebook
**आमचं खोटं नाटं भांडणं**
:-*
तिचं ते लटकं रागवणं,
अन् माझं तिला मनवणं..
आता तर रोजचंच झालंय,
आमचं खोटं नाटं भांडणं..!!

मग उगाच तिचं ते रुसणं,
मला बघून ते गोड हसणं..
मी जवळ घेतल्यावर,
गालातच तिचं लाजणं..!!

मग उगाच मला मारणं,
मी तिची माफी मागणं..
तिचं "वेडा आहेस" म्हणनं,
अन् घट्ट मिठी मारणं..!!

मग तिला चंद्र दाखवणं,
तीनं ते प्रेमाणे पाहणं..
ती निर्मय पाहू लागल्यावर,
तिच्या गालावर किस करणं..!!

तिचं "हट्ट वेड्या" म्हणणं,
माझं "मी आहेच" म्हणणं..
तिचं पुन्हा चंद्राला पाहणं,
माझं तिच्या डोळ्यात पाहणं..!!

तिला चंद्रात मी दिसणं,
मला माझ्यात ती दिसणं..
एकटक डोळ्यात पाहून,
माझं हलकेच हसणं..!!

मग आमचं चांदण्या पाहणं,
मिठीत बसून त्यांना मोजणं..
"माझं जास्त तुझंच का कमी?"
चला.. पुन्हा सुरू भांडणं..!!

मग तिचं पुन्हा रुसणं, रागवणं,
माझं समजावण अन् मनवणं...
आता तर रोजचंच झालंय,
आमचं हे खोटं नाटं भांडणं...!!!
-
स्वलिखीत...
 प्रेमवेडा राजकुमार
(धनराज होवाळ)
पलुस, जि. सांगली
9970679949