Author Topic: ** कवितांची होडी **  (Read 635 times)

Offline धनराज होवाळ

  • Jr. Member
  • **
  • Posts: 232
  • Gender: Male
  • माझ्या लेखणीतून..
    • Facebook
** कवितांची होडी **
« on: July 06, 2015, 11:10:16 PM »
*** कवितांची होडी ***

प्रेमात चिंब चिंब भिजलेली,
परी तुझी नी माझी जोडी..
अन् प्रेमसागरात चालणारी,
माझ्या कवितांची गं होडी..!!

परी तु आहेस म्हणुनच,
माझ्या शब्दांत गं गोडी..
तुझ्या मनात ही गुंजते,
माझ्या कवितांची गं होडी..!!

माझ्याकडे बघून गालातच,
जेव्हा तु लाजते ना थोडी..
तेव्हा स्पंदनावर ही तैरते,
माझ्या कवितांची गं होडी..!!

तुझ्या माझ्या प्रेमातली,
सारी सोडवूत आता कोडी..
मग प्रेमपावसात ही चालवू,
माझ्या कवितांची गं होडी..!!

उगाचंच तुझं रुसणं फुगणं,
माहीतेय तुझी सारी खोडी...
तुझ्या या प्रेमावरच चालते,
माझ्या कवितांची गं होडी...!!!
-
स्वलिखीत...
प्रेमवेडा राजकुमार

(धनराज होवाळ)
पलुस, जि. सांगली
9970679949

Marathi Kavita : मराठी कविता