Author Topic: ** माझ्या लेखणीतुन **  (Read 744 times)

Offline धनराज होवाळ

  • Jr. Member
  • **
  • Posts: 232
  • Gender: Male
  • माझ्या लेखणीतून..
    • Facebook
** माझ्या लेखणीतुन **
« on: August 09, 2015, 09:53:09 AM »
**माझ्या लेखणीतुन**
माझ्या लेखणीतुन मला,
असं काही घडवायचंय..
जणु गुलाबावर सुगंध,
मोगऱ्याचा चढवायचंय..!!

शब्द तर तेच नेहमीचे,
बोलण्यातीलच असणार..
मी जास्त तर काही नाही,
फक्त त्यांना सजवणार..!!

माझा एक एक शब्द,
नकळत बोटातुन सुटणार..
गरुडझेप घेण्यासाठी,
मग पंख त्यांना फुटणार..!!

माझा प्रत्येक शब्द,
हवेत कुठेतरी विरणारच..
कविता करण्यासाठी,
माझे कवीमन झुरणारच..!!

माझ्या लेखणीतुन,
मी लिहीत जाणारच..
शब्दांचा रोज नवा,
मी प्रेमवेडा घडणारच...!!!
-
प्रेमवेडा राजकुमार
(धनराज होवाळ)
पलुस, जि. सांगली
9970679949

Marathi Kavita : मराठी कविता