वरून रागीट स्वभावाचे आतून प्रेमळ मनाचे
कधी लागेल असे बोले जे मनाला टोचे
कधी बोले असे जे मनात करी घर स्पर्शाचे
कधी काहीं चुकल्यास डोस देई रागाचे
कधी पाटीवरून हाथ फिरवी मायेचे
कधी असतात हात धरून जेव्हा येतात क्षण दुःखाचे
गर्वाने उभे असतात सोबत जेवा क्षण असतात सुखांचे
कधी असतात आईसारख्या प्रेमळ रूपाचे
कशे शब्दात बाबान चे प्रेम सांगायचे
बाबा तर रूप परमेश्वराचे.
: Amit