Author Topic: * प्रेमाचं नातं *  (Read 3300 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 883
  • Gender: Male
* प्रेमाचं नातं *
« on: September 06, 2014, 01:17:07 PM »
जाणता अजाणता जुळले नातं
जसं दवबिंदु अन् गवताचं पात
सहवास क्षणभराचा एवढीच खंत
पण तरीही विचार कोण करतं

 

दवबिंदुच प्रेम पात्यापात्यावर ओघळतं
कधी अश्रुं तर कधी मोती होउन बरसतं
अलगदपणे येउन मातीत मिसळतं
बघुन हे पात्याचं मन करपतं

 

जीवापाड जपलेलं नाते असे तुटतं
तेव्हा काय अन् कसे वाटतं
आठवणींच्या वेदनांनी मन कस झुरतं
हे ज्याने प्रेम केलंय त्यालाच कळतं

 

विसरायचं म्हटले तरी कोण विसरतं
नाही म्हटलं तरी पुन्हा पुन्हा आठवतं
कारण प्रेमाच नातं हे असच असतं
प्रेम तर नाही,आयुष्य माञ संपत...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai.

Marathi Kavita : मराठी कविता