Author Topic: * पाउलखुणा *  (Read 1155 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 883
  • Gender: Male
* पाउलखुणा *
« on: September 29, 2014, 09:57:12 AM »
* पाउलखुणा *
आठवांच्या गावातुन चालताना
दिसतात तुझ्या पाउलखुणा
पुन्हा जवळ येतो
मी तुझा होतांना

पालवी फुटे भावनांना
स्पर्श तुझा होतांना
मन होई बावरे
पुन्हा तुला बघतांना

नाहीस तु तरी
मन मान्य करेना
वा-याची येता लहर
पाहतो तुला येतांना

आठवांच्या गावातुन फिरतांना
माघारी परतु वाटेना
न्याव्यात सोबत कायमच्या
आज तुझ्या पाउलखुणा...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai.

Marathi Kavita : मराठी कविता


saraswati kulat

  • Guest
Re: * पाउलखुणा *
« Reply #1 on: September 30, 2014, 09:13:03 PM »
it was very nice poem,i like it very much.....

Offline Shrikant R. Deshmane

  • Full Member
  • ***
  • Posts: 501
  • Gender: Male
  • कविता म्हणजे कागद, लेखणी अन् तू...
Re: * पाउलखुणा *
« Reply #2 on: October 01, 2014, 01:42:18 PM »
chan aahe ganeshji...  :)
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]