Author Topic: * ऐश्वर्या *  (Read 856 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 883
  • Gender: Male
* ऐश्वर्या *
« on: November 17, 2014, 06:25:04 PM »
* ऐश्वर्या *
सौंदर्याची आहे ती राणी
साथ लाभलीय तिला ऐश्वर्याची
करुन नेहमीच आपली मनमानी
माझ्याशी कारण नसतांनाही भांडायची

ओठांवर हसु डोळ्यांत पाणी
रडत रडत गाह्राणं सांगायची
काय होतं तिच्या ध्यानीमनी
चारचौघात माझी पंचायत करायची

थकलोय मी तिला सांगुनी
मला भांडण नाही जमायची
नावाप्रमाणेच लाभलंय तुला `ऐश्वर्य´
मज गरीबाला कुठुन मिळायची...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai.

Marathi Kavita : मराठी कविता