Author Topic: * माझी कविता *  (Read 1083 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 880
  • Gender: Male
* माझी कविता *
« on: December 08, 2014, 11:10:37 PM »
* माझी कविता *
वादाच्या भोव-यात
प्रश्नाच्या कचाट्यात
मनाच्या गाभा-यात
माझी कविता...

कोणाच्या ओठांवर
कोणाच्या तालावर
बोलते नाचते
माझी कविता...

ह्रदयाच्या स्पंदनात
प्रीत बंधनात
उमलुन येते
माझी कविता...

विरहाच्या एकांतात
एकाकी श्वासात
साथ देते
माझी कविता...

गहिवरल्या भावनेला
दाटलेल्या कंठाला
शब्द देते
माझी कविता...

अश्रुच्या वादळाला
भिजलेल्या पापणीला
बांध फोडते
माझी कविता...
कवी-गणेश साळुंखे...!
Mob-7710908264
Mumbai
Date-: 08/12/2014
Time-: 11:08 PM

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Shubham Vhaval

  • Newbie
  • *
  • Posts: 19
  • Gender: Male
Re: * माझी कविता *
« Reply #1 on: December 08, 2014, 11:44:11 PM »
Ek number re... avadli mla...