Author Topic: *सांग तु माझा कवी होशील*  (Read 1321 times)

Offline Aishu

  • Newbie
  • *
  • Posts: 32
*सांग तु माझा कवी होशील*
« on: March 08, 2015, 12:37:08 AM »
*सांग कवी तु माझा होशील*सांग कवी तु माझा होशील......
दु:ख माझं तुला मी सांगताना
डोळ्यातुन झरा माझ्या वाहील
प्राजक्त फुलांचा सडा समजुन
अश्रु ते माझे तु सांग झेलशील


सांग कवी तु माझा होशील....
होईन मी लहरनारी लाट तुझी
सागर तु माझा सांग होशील
डुलत झुलत सागरात मी तुझी
तु माझा सतजन्मासाठी सांग होशील


सांग कवी तु माझा होशील.....
होईन रे मी तुझीच सावली
विसावा तु त्यात सांग घेशील
मी अजुनही आहे कोरडी तशीच
तुझ्यासंगती मला तु न्हाऊन सांग नेशील


सांग कवी तु माझा होशील....
कवी मनाचं रे नातं तुझं माझं
ह्रृदयाच्या पंखानखाली सांग तु जपशील
एकमेकांमध्ये दोघे होऊन जाऊया दंग
फुलांत हलकेच तु मला मिटुन सख्या सांग घेशीलसांग कवी तु माझा होशील...
किती छान लिहीतो दोघे ही एकमेकांवर
कविता तु सांग त्या जपशील
मनांत जे चमचमनारे आहेत दवबिंदु
ते कवितेच्या स्वरुपात तु माझ्यासवे सांग उमटवशील......सांग तु माझा कवी होशील......सांग सख्या तु माझा कवी होशील........
®ऐश्वर्या सोनवणे.
मुंबई....
(क्रुपया कवितेखालील नाव काढु नये व कवीता कॉपी ही करु नये...) 

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Amit K

  • Newbie
  • *
  • Posts: 22
  • Gender: Male
Re: *सांग तु माझा कवी होशील*
« Reply #1 on: March 08, 2015, 04:59:59 PM »
Nice . :)

shailesh borate

  • Guest
Re: *सांग तु माझा कवी होशील*
« Reply #2 on: March 08, 2015, 10:49:51 PM »
Aishuji khup chan

हृदयनाथ

  • Guest
Re: *सांग तु माझा कवी होशील*
« Reply #3 on: March 15, 2015, 11:56:22 PM »
सांग कवी तु माझा होशील......
दु:ख माझं तुला मी सांगताना
डोळ्यातुन झरा माझ्या वाहील
प्राजक्त फुलांचा सडा समजुन
अश्रु ते माझे तु सांग झेलशील


नको नको सांगूस दुःख तुझे तू मला
नको वाहू दे नेत्रकमलातून तुझिया झरा
नको मज प्राजक्त फुलांचा सडा
राह्तो मी तुझियापुढती खडा