Author Topic: * मी प्रेम केलं... *  (Read 1339 times)

Offline धनराज होवाळ

 • Jr. Member
 • **
 • Posts: 235
 • Gender: Male
 • माझ्या लेखणीतून..
  • Facebook
* मी प्रेम केलं... *
« on: April 01, 2015, 04:12:01 PM »
प्रेम करताना कसला विचार करायचा नसतो,
कारण विचार करुन प्रेम कधी करता येत नाही...

मी प्रेम केलं...
मी प्रेम केलं,
तुझ्या हसण्यावर,
तुझ्या शांत बसण्यावर,
तुझ्या रुसण्यावर,
तुझ्या मनमोकळ्यापणावर,
आणि तुझ्या वेगळं वाटणा~या स्वभावावर...!!

मी प्रेम केलं...
मी प्रेम केलं,
तुझ्या मंजुळ बोलण्यावर,
मासोळी डोळ्यातील बोलकेपणावर,
तुझ्या निरागसतेवर,
आणि तेवढंच तुझ्या शांतपणावर...!!

मी प्रेम केलं...
मी प्रेम केलं,
तुझ्या कधीतरी रुसण्यावर,
रागाने लाल झालेल्या ता नाकावर,
लटके नाक मुरुडण्यावर,
आणि तुझ्या गाल फुगवून बसण्यावर...!!

मी प्रेम केलं...
मी प्रेम केलं,
तुझ्या इश्श्श्य... म्हणण्यावर,
तारुण्य सुलभ लाजण्यावर,
लाजुन झुकणा~या तुझ्या नजरेवर,
आणि तुझ्या गुलाबी झालेल्या त्या गालांवर...!!

मी प्रेम केलं...
मी प्रेम केलं,
तुझ्या स्वप्नांवर,
ईच्छा-आकांक्षावर,
तुझ्या मनातील भावनांवर,
तु सोसलेल्या वेदनांवर,
आणि तुझ्या जीवनातील प्रत्येक दुःखांवर...!!

मी प्रेम केलं...
मी प्रेम केलं,
तुझ्या प्रत्येक श्वासांवर,
हृदयातील स्पंदनांवर,
अन् माझ्या आठवणीत तु जागुन काढलेल्या त्या प्रत्येक रात्रींवर...!!

मी फक्त प्रेम केलं,
कारण प्रेम फक्त करायचं असतं ते निःस्वार्थ मनांनी..
प्रेम फक्त द्यायचं असतं ते निरपेक्ष अंतःकरणांनी...!!

मी फक्त प्रेम केलं मनापासुन मनावर,
कधीतरी मलाही असंच प्रेम मिळेल...
कधीतरी मला ही असंच प्रेम मिळेल,
खरं प्रेम करणारं मला ही कुणीतरी भेटेल...!!

कारण मी फक्त प्रेम केलं...
अन् मला ही फक्त प्रेम मिळावं..
मला ही फक्त प्रेम मिळावं...!!!
-
फक्त तुझाच,
प्रेमवेडा राजकुमार

Marathi Kavita : मराठी कविता


Offline sachinikam

 • Jr. Member
 • **
 • Posts: 162
 • Gender: Male
Re: * मी प्रेम केलं... *
« Reply #1 on: April 01, 2015, 05:58:55 PM »
chan