Author Topic: * मी असा का वागतोय *  (Read 1236 times)

Offline धनराज होवाळ

  • Jr. Member
  • **
  • Posts: 236
  • Gender: Male
  • माझ्या लेखणीतून..
    • Facebook
* मी असा का वागतोय *
« on: April 02, 2015, 07:26:02 AM »
सांग ना गं सखे,
मी असा का वागतोय..
तुझी आठवण आली,
कि एकटाच हसतोय..!!

मित्र विचारतात मला,
तु असा का वागतोय..
त्यांना आता कसं सांगू,
मी तुझ्यावर मरतोय..!!

कुठेतरी एकटक पाहून,
तुझ्या आठवणीत भुलतो..
गालातल्या गालात हसुन,
तुझ्या प्रेमात झुलतो..!!

मित्रांच्यात जरी असलो,
मन मात्र तिथे नसते..
तुझा पाठलाग करत,
तु जाईल तिथे असते..!!

तुझ्याशी बोलायला,
मी वेडापिसा होतो..
तुझा आवाज ऐकण्यासाठी,
खुप बैचेन होतो..!!

समज ना सखे मला,
तुझ्यावर प्रेम माझं जडलंय..
हृदयाची स्पंदने म्हणतात,
माझं हृदय तुझ्यासाठीच घडलंय..!!

मित्र माझे म्हणतात,
एक प्रेमवेडा मी झालोय..
कारण कविता करतोय तुझ्यावर,
आता एक शब्दवेडा मी झालोय..!!

आतातरी तुला समजले असेल,
मी असा का वागतोय..
आयुष्यभराची साथ मला दे,
एवढंच तुला मी मागतोय...!!!
-
प्रेमवेडा राजकुमार
9970679949

Marathi Kavita : मराठी कविता