Author Topic: * मन माझे *  (Read 1346 times)

Offline धनराज होवाळ

  • Jr. Member
  • **
  • Posts: 231
  • Gender: Male
  • माझ्या लेखणीतून..
    • Facebook
* मन माझे *
« on: April 02, 2015, 08:07:34 AM »
तुझ्या अनमोल आठवणींमध्ये,
अजुन गुंतलंय हे मन माझे..
तुझ्या एका नजरेने सुद्धा,
घायाळ होते हे मन माझे..!!

असतेस जेव्हा तु समोर माझ्या,
तरी बोलत नाही हे मन माझे..
नसतेस जेव्सा तु समोर माझ्या,
तुलाच शोधते हे मन माझे..!!

जिकडे तिकडे तुलाच पाहून,
एकटेच हसते हे मन माझे..
दुसऱ्‍यासोबत तुला पाहील्यावर,
बैचेन होते हे मन माझे..!!

स्पर्श तुझा मज झाल्यावर,
तुझ्यातच हरवते हे मन माझे..
तुझ्या सोबतीचे प्रत्येक क्षण,
आठवूण रडते हे मन माझे..!!

प्रतिक्षा आहे तुझ्या होकाराची,
समज ना एकदा हृदय अन् मन माझे..
दे आता जन्मोजन्मीची साथ,
तुझीच वाट पाहतेय हे वेडं मन माझे...!!!
-
प्रेमवेडा राजकुमार

( धनराज होवाळ )
9970679949
www.facebook.com/PremVeda143

Marathi Kavita : मराठी कविता