Author Topic: * बंधन *  (Read 1260 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 883
  • Gender: Male
* बंधन *
« on: August 12, 2015, 11:02:29 AM »
* बंधन *

वा-यावर उडणा-या तुझ्या केसांना
हाताने आता तु सावरु नकोस
लाजेने चुर झालेल्या चेह-याला
ओढणीने उगाच तु लपवु नकोस

रस्त्यावरती चालणा-या या लोकांना
बघुन तु घाबरु नकोस
धडधड उडणा-या तुझ्या काळजाला
अजुन बैचेन तु करु नकोस

आकाशी ढग दाटुन आले म्हणुन
आडोसा लपण्यासाठी तु शोधु नकोस
थेंबा-थेंबाने भिजवुन घे स्वताला
रोमांच पावसाचा तु गमवु नकोस

ओलांडुन ये मर्यादेचा उंबरठा
बंधनात आज तु अडकु नकोस
परतुन येणार नाहीत हे दिवस
अनुभवल्याशिवाय त्यांना तु राहु नकोस.
कवी-गणेश साळुंखे.
Mob-7715070938

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Dedendi

  • Newbie
  • *
  • Posts: 2
Re: * बंधन *
« Reply #1 on: August 13, 2015, 06:12:53 PM »
It is really important topics I think it's absolutely wonderful.

maxbet
« Last Edit: June 08, 2017, 04:04:48 PM by Dedendi »