Author Topic: ==* दुरावा *==  (Read 1074 times)

Offline SHASHIKANT SHANDILE

  • Jr. Member
  • **
  • Posts: 358
  • Gender: Male
  • शशिकांत शांडिले, नागपुर
==* दुरावा *==
« on: September 19, 2015, 11:06:54 AM »
तू रुसली अशी तू न हसली कधी
दुरावून मला तू न दिसली कधी
आठवणीत गुंतलो तुझ्या मी आता
परतुनी पुन्हा तू न बघितलं कधी

जगलो जरी हे जगण्याचे जगणे
जगतांना तरी ते न जगलो कधी
काटल्या कटेना दिवस माझे आता
तुझी पाहली वाट ती न संपली कधी

मी रडलो हसलो विचारात फसलो
हाकं हृदयाची तू न जाणली कधी
शोधाया तुला शोधले असतेगं मीही
दिले शब्द तू मी न तोडले कधी

विसरू कसे मी ते बोलणे तुझे
न भेटीची अट मी न मोडली कधी
जगतोय कधीचा एकटाच असा मी
तुझ्या वाटी दुःख न वाहिले कधी

तू रुसली अशी तू न हसली कधी
दुरावून मला तू न दिसली कधी
आठवणीत गुंतलो तुझ्या मी आता
परतुनी पुन्हा तू न बघितलं कधी
---------------------****---------------------
शशिकांत शांडिले (SD), नागपूर
Mo.9975995450
दि.18/09/2015
Its Just My Word's

शब्द माझे!

Marathi Kavita : मराठी कविता