Author Topic: ==* विश्वास *==  (Read 1150 times)

Offline SHASHIKANT SHANDILE

  • Jr. Member
  • **
  • Posts: 349
  • Gender: Male
  • शशिकांत शांडिले, नागपुर
==* विश्वास *==
« on: September 23, 2015, 11:14:17 AM »
शंका घेऊन रुसून बसलेल्या प्रेयसीला प्रियकर म्हणतो . . . . . . . . . . . . . . 

विश्वास हरवला माझ्यावरचा
आज तू शंका घेतली
दिसले नयनी ते सत्य नव्हते
मला गं तू न जाणली

छोटे मन अनं विश्वास छोटा
विस्वास माझा तोडला
विश्वासाच्या या खेळामधला
नियम सखे तू मोडला

शंका मनी जर जाग्या झाल्या
येऊन का न विचारले
एकतर्फी निर्णय घेउन सजनी
मन माझे हे तू तोडले

ये परतुनी समझ मला तू
प्रेम हे खोटे नाही
प्रेमामध्ये शंकाहि करणे
नवीन काही नाही

तुझा सखे मी बनून राहलो
तुझविन करमत नाही
शपथ घेऊनी तुला सांगतो
तुझविन कुणीही नाही 

शपथ घेऊनी तुला सांगतो
तुझविन कुणीही नाही 
--------------****--------------
शशीकांत शांडीले (SD), नागपूर
भ्रमणध्वनी - ९९७५९९५४५०
दि.२३/०९/२०१५
Its Just My Word's

शब्द माझे!

Marathi Kavita : मराठी कविता