Author Topic: ==* तुझविन जगवत नाही *==  (Read 949 times)

Offline SHASHIKANT SHANDILE

  • Jr. Member
  • **
  • Posts: 358
  • Gender: Male
  • शशिकांत शांडिले, नागपुर
==* तुझविन जगवत नाही *==
« on: October 26, 2015, 11:35:04 AM »
कवितेतील प्रत्येक चार ओळी 11 ते 7 उतार -----

विसरली असशील तू मला
पण मी विसरु शकलो नाही
चांदन्याचे रूप तुझे आजही
मनातून काढू शकलो नाही

काळही लोटला भेटण्याचा
तू अजुनही दिसली नाही
तुझ्या त्या नजर फेरण्याला
सहन करता आले नाही

जगतोय जगन्याचे मी
तुझविन रमतं नाही
मार्ग विसरण्याचा तुला
कुठेच गवसत नाही

वाटतं कधी भेटावं
मनही मानत नाही
वाटही तुझ्या घरची
कुनीच सांगत नाही

जगावे एकट्याने
जगवतही नाही
तुझविन साजनी
हसवतही नाही
---------*****-----------
शशीकांत शांडीले(SD),नागपुर
दि.22/10/2015
Its Just My Word's

शब्द माझे!

Marathi Kavita : मराठी कविता