Author Topic: कॉलेजची शाळा  (Read 937 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 883
  • Gender: Male
कॉलेजची शाळा
« on: October 27, 2015, 11:23:32 PM »

शाळेने हसवलं कॉलेजने रडवलं
कारण शाळेत मिञ भेटली
तर कॉलेजला गर्लफ्रेंड पटली
शाळेची मिञ कधीपण भेटायची
कॉलेजची गर्लफ्रेंड कॉलेजलाच भेटायची
शाळेतल्या मस्तीला बंधन नव्हतं
कॉलेजला नियमांचच कुंपण होतं
शाळेत स्पर्धा खेळातच होती
कॉलेजला तर सगळीकडेच होती
शाळेत फक्त हसायलाच शिकलो
कॉलेजला प्रेमात रडायलाही शिकलो
आता मोठेपणी वाटतय मनाला
शाळेच्या बाकांवर बालपन राहिलं
तर कॉलेजमध्ये तारुण्य हरवलं
पण तरीही यांनीच मला घडवलं.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938
« Last Edit: October 28, 2015, 02:36:47 PM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता