* मी प्रेम करावे *
प्रस्तावना : जेव्हा आपल्यावर कुणी खास माणूस प्रेम करतं,तेव्हा आपल्याला आपली खरी ओळख होते.नव्याने होते.त्याला आपल्यात काय आवडत असेल.नक्की सांगता येत नाही.पण आपण स्वत:साठी खास होऊन जातो.अन त्याच्याच रंगात रंगून जातो.आपला कण अन कण त्याच्याच साठी झुरतो.त्याचेच गीत गातो.जणू त्याच्याच साठी जगतो.आणि आपण शेवटी आपल्याच प्रेमात पडतो कारण..तो आपल्या प्रेमात पडलेला असतो ना !!
** मी प्रेम करावे **
मी प्रेम करावे..
ह्या शब्दांवर
प्रेम करावे मी..
ह्या डोळ्यांवर
करावे मी प्रेम..
ह्या श्वासांवर
ह्रदयीच्या हरेक धुंद स्पंदावर..
शब्दं जे गाते तुझ्याचसाठी
डोळे जे बघतात स्वप्नं तुझी
श्वास जे घेते तुझ्याचसाठी
अन
प्रेम करावे मी..
ह्या देहावर..
प्रीत जडली तुझी ज्यावर
ह्रदयीच्या हरेक धुंद स्पंदावर..
Author : Unknown