प्रेम कल्पिता मानसी - कविता - 5
Copyrights Reserved....
कविता संग्रह - प्रेम कल्पिता मानसी
कवी - हितेश राणे myself...
कविता - प्रेमासाठी
प्रेमासाठी रसीक व्हावं लागतं
कामुक नजर चालत नाही
प्रेमात पडल्यावर त्याग लागतो
हट्ट धरून चालत नाही....
कधी आंसू कधी हसू दया पण
Filmy होउन चालत नाही
खा-या जीवनात आपल्या Filmला
Happy-end रोजच मिळत नाही
फुलं प्रेमपत्र खड्ड्यात घाला
माणसापेक्षा ते मोठे नाही
पत्रांना काय कोणीही जपेल
नाते जपणे सोपे नाही
रुसवा फुगावा मनीच ठेवावा
नेहमीच डाळ काही शिजत नाही
जीव-जीव्हाळा लावावा
जीव देउन चालत नाही... जीव देउन चालत नाही ....