Author Topic: लव्ह at फर्स्ट साईट...  (Read 4015 times)

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
लव्ह at फर्स्ट साईट...
« on: December 12, 2012, 01:19:55 AM »
तो दिवस अजूनही आठवतो
जेव्हा मी तुला पहिल्यांदा पहिले होते..
पाहता पाहता तुझ्यात स्वताला हरवले होते
मलाच कळले नव्हते
त्यावेळी मला नक्की काय झाले होते
त्या अवघ्या दोन क्षणांत मी माझे
अवघे आयुष्य तुझ्यावर वाहिले होते
तो दिवस अजूनही आठवतो
जेव्हा मी तुला पहिल्यांदा पहिले होते...!!१!!

तुला पाहताच पूर्ण आयुष्याचे
तुझ्यासोबतचे चित्र रंगवले होते
मला पाहता पाहता तुझ्याही मनात
त्यावेळी काहीतरी आले होते
क्षणभर हसून तु ते कदाचित
मला दाखविले होते
तो दिवस अजूनही आठवतो
जेव्हा मी तुला पहिल्यांदा पहिले होते...!!२!!

तो क्षण अजूनही आठवतो
आठवता आठवता मनाच्या
खोल गाभाऱ्यात घेऊन जातो
जिथे कुणीच नव्हते फक्त आपण दोघे
अन आपल्या प्रेमाचे जग होते
अन मग तु मला तुझे स्वप्न दाखविले होते
तो दिवस अजूनही आठवतो
जेव्हा मी तुला पहिल्यांदा पहिले होते..!!३!!

किती स्वप्ने होती आपली किती होता विश्वास
काही न बोलता आपण जणू घेतला होता
एकमेकांचा ध्यास
मी मनोमन विचारले होते अन
तुही मग मला मनोमन स्वीकारले होते
एकत्र जगण्याचे वचन मग आपण
एकमेकांना घातले होते
तो दिवस अजूनही आठवतो
जेव्हा मी तुला पहिल्यांदा पहिले होते...!!४!!

खरेतर मी तुला पाहण्याचे काही करणाच नव्हते
मी इतके वाहून जाण्याचे काही करणाच नव्हते
तरीही तुझ्याबरोबरच जगण्याचे वचन
मी मनोमनच तुला दिले होते
तो दिवस अजूनही आठवतो
जेव्हा मी तुला पहिल्यांदा पहिले होते...!!५!!
 
तुला पाहताना तु कोणीतरी आहेस
हे माझ्या ध्यानातही नव्हते
तुला पाहून तुझ्याशी काही बोलावे
हे माझ्या मनातही नव्हते
तरीही का तुला निरोप देताना
माझ्या जीवावर बेतले होते
तो दिवस अजूनही आठवतो
जेव्हा मी तुला पहिल्यांदा पहिले होते...!!६!!

कदाचित तुला पाहून मला
पहिलं पहिलं प्रेम झाले होते
तो दिवस अजूनही आठवतो
जेव्हा मी तुला पहिल्यांदा पहिले होते...!!७!!

.... प्राजुन्कुश
.... Prajunkush


 
« Last Edit: December 17, 2012, 09:41:52 PM by Prajunkush »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Mandar Bapat

 • Jr. Member
 • **
 • Posts: 263
 • Gender: Male
Re: लव्ह at फर्स्ट साईट...
« Reply #1 on: December 12, 2012, 01:34:04 AM »
chan

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: लव्ह at फर्स्ट साईट...
« Reply #2 on: December 12, 2012, 01:50:53 AM »
Mandar sir...
... Khup abhar manapasun.

Arti Pandit

 • Guest
Re: लव्ह at फर्स्ट साईट...
« Reply #3 on: December 17, 2012, 10:02:33 PM »
khup chan kavita ahe Prajunkush ji. Sorry ha ek suchavtey ki hya kavitech nav Pahile Prem asate tar khup chan zale asate.

Offline देवेंद्र

 • Jr. Member
 • **
 • Posts: 90
Re: लव्ह at फर्स्ट साईट...
« Reply #4 on: December 19, 2012, 07:48:06 PM »
Kharach chaan ahe

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: लव्ह at फर्स्ट साईट...
« Reply #5 on: December 20, 2012, 06:37:48 PM »
Arti ji, Devendra ji...
... Khup abhar agadi manapasun.

Offline SANJAY M NIKUMBH

 • Full Member
 • ***
 • Posts: 502
Re: लव्ह at फर्स्ट साईट...
« Reply #6 on: December 20, 2012, 08:33:41 PM »
chhan kavita

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: लव्ह at फर्स्ट साईट...
« Reply #7 on: December 21, 2012, 03:41:20 PM »
Sanjay ji...
... Khup abhar manapasun.