Author Topic: CHECK AND MET........  (Read 1119 times)

Offline swami sakha

 • Newbie
 • *
 • Posts: 6
CHECK AND MET........
« on: March 06, 2014, 10:10:57 PM »
(हाय .... खरं सांगू मी तिच्यासाठी मुददाम हरत होता. कारण हरता हरता मला तिच्या प्रेमाचा बुद्धिबळपट जिंकायचा होता.!!)

CHECK AND MET........

प्रेमाच्या बुद्धिबळात मी
तिला खेळण्याचे निमंत्रण दिले
तिने ही होकार देवून काळे घर घेवून
मी तिला जिंकून दाखवण्याचे आवाहन दिले

माझ्या पहिल्याच भेटीच्या प्यादाने
दोन पाऊले पुढे टाकत तिला गुलाबाचे फुल दिले
तिने ही नकार देत तिच्या आडदांड स्वभावाच्या हत्तीने
माझ्या प्यादाला, फुलाला पायदळी तुडविले

मग हळूच धूर्त घोड्याच्या चालीने
माझ्या दुसऱ्याही भेटीच्या प्यादाला मारले
मग मी ही नमतेपणा घेत शांतीच्या प्यादाला
परत एक फुल देवून पुढे सरसावले

माझ्या प्रत्येक चालींना
ती निर्दयपणे मारत होती
माझ्या सहनशीलतेचे घोडे, हत्ती, आणि उंट
घाबरून एकही पाऊल पुढे टाकत नव्हती

तिच्या तिखट स्वभाच्या उंटाच्या
चालीने माझ्या आशेची सर्व प्यादी मारली
माझ्या प्रेमाच्या प्रत्येक चाली निष्फळ ठरल्याने
माझ्या दिलाच्या राजाच्या छातीत धडकी भरली

तिच्या बेभान आणि उन्मत्त स्वभावाचे उंट, हत्ती, घोडे
अतीच आक्रमक होवू लागले
तिच्या प्रेमाचा होकार मिळेल ह्या आशेने माझे सैन्य
माझ्या साठी बलिदान करत धारातीर्थ पडू लागले

हळूच माझ्या वजीराने चौफेर चाल करत
तिला माझ्या प्रेमाचे PROPOSE केले
तेवढ्यात तिच्या चतुर विचारांच्या वजीराने
माझ्या निष्पाप वजिराला चारी मुंड्या चीत केले

माझ्या प्रेमाच्या प्रत्येक चाली
ती नेस्तनाबूत करत होती
माझ्या प्रेम जिंकण्याच्या स्वप्नांना
ती सहज उध्वस्त करत होती

शेवटी प्रेमाच्या रणांगणावर
माझ्या दिलाचा राजा एकटाच उरला होता
हातात कटियार घेवून " तू माझी नाही झाली तर
मी स्वतःला संपवेन म्हणून तिला सांगत होता "

हळूच तिने माझ्या हातात तिचा हात देवून
माझ्या डोळ्यांत पहात स्मित हास्य केले
" मुददाम माझ्यासाठी हरलास ना "
मला  मिठीत घेत CHECK AND MET दिले.
-- सुनील ..........
8767561782

Marathi Kavita : मराठी कविता


Offline MK ADMIN

 • Administrator
 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,514
 • Gender: Male
 • MK Admin
  • marathi kavita
Re: CHECK AND MET........
« Reply #1 on: March 07, 2014, 09:15:06 AM »
mast....loved it.